Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन
9607977955
grampanchayatmirwadi8@gmail.com
PIN: 412207

भौगोलिक माहिती

स्थानिकता

मीरवाडी हा गाव पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात येतो.

भौगोलिक संरचना

मीरवाडी समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० ते ७०० मीटर उंचीवर स्थित आहे.

जलवायू

वायू • ग्रामसभेत फटाकाबंदी ठराव करून जनजागृती च्या माध्यमातून प्रदूषणमुक्त गाव यशस्वीपणे राबवले. • कृषी , घरगुती , व व्यावसायिक कचरा योग्य व्यवस्थापन साठी जाळणे बंद करून नैसर्गिक खत निर्मितीसाठी प्रशिक्षण राबवून वायू प्रदूषण टाळण्यात आले. • गावातील पर्यावरण पूरक योग्य सवईसाठी सायकल पाथ निर्माण करण्यात आले. • ग्रामस्थांना इलेक्ट्रिक वाहने खरेदीबाबत जनजागृती करून इ-चार्ज सुविधा उपलब्ध करण्यसाठी अश्वाशित करण्यात आले. • संपूर्ण कुटुंबाकडे LPG गस उपलब्ध असून इतर कसलेही प्रदूषण होणार नाही या साठी सार्वजनिक शपथ वजवून घेण्यात आली. जल • जलस्त्रोतांचे शुद्धीकरणाची प्रक्रिया लोकसहभागातून पूर्ण करण्यात आली. • जुने पाणवठे , विहिरी , ओढे यांची देखभाल व दुरूस्ती करण्यात आली. • सांडपाणी व्यवस्थापन साठी बंदिस्त गटार , शासकीय योजनेतून शोषखड्डे , पाणी पुनरवापरासाठी योग्य नियोजन आखले आहे. • सणांच्या वेळी होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत तात्पुरते कृत्रिम तलाव निर्मिती करण्यात येते. • पर्यावरण पूरक मूर्तींचा वापर होण्यासाठी जनजागृती करण्यात येवून ती ग्रामपंचायत देखरेखेखाली प्रभावी राबविण्यात आली. • शासकीय इमारती व मालकी इमारतींना रेनवाटर हार्वेस्टिंग करण्याचे नियोजन करून ते नोंदीच्या वेळी तपासले जाईल याची घोषणा करण्यात आली. • पाणी अडवा पाणी जिरवा हि संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात आली. • लोकसहभाग व सामाजिक संस्था यांमार्फत ओढ्या नाल्यातील गाळ काढण्यात आला. • जास्तीत जास्त शेतकर्यांनी ठिबक , तुषार सिंचन वापरासाठी विशेष जनजागृती कार्यक्रम , मार्गदर्शन मेळावे आयोजित करण्यात आले.

कृषी

मीरवाडी मधील प्रमुख व्यवसाय शेती आहे.

प्राकृतिक साधनांची उपलब्धता

मीरवाडी च्या आजूबाजूला काळी व लाल माती आहे.

संस्कृती आणि इतिहास

मीरवाडी मध्ये ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे आढळतात.